---Advertisement---
सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली असून उष्णतेचा परिणाम थेट त्वचेवर जाणवू लागला आहे. कडक उन्हामुळे त्वचा कोरडी, निस्तेज आणि थकलेली दिसते. याशिवाय धूळ, प्रदूषण आणि घामामुळे त्वचेचे नुकसान अधिक वाढते. त्यामुळे या दिवसांत त्वचेची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक ठरते.
बाजारात उपलब्ध असलेल्या विविध स्किन केअर उत्पादनांचा वापर केला जातो, मात्र त्यामध्ये केमिकल्सचे प्रमाण जास्त असल्याने दीर्घकालीन दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणूनच, घरगुती आणि नैसर्गिक उपाय अधिक सुरक्षित आणि परिणामकारक मानले जातात. विशेषतः रात्री झोपण्यापूर्वी त्वचेची काळजी घेतल्यास सकाळी त्वचा ताजीतवानी आणि फ्रेश दिसते.
उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी दिनचर्या
उन्हाळ्यात त्वचा निरोगी ठेवण्यासाठी योग्य दिनचर्या महत्त्वाची आहे. शरीरातील पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवणे सर्वात गरजेचे आहे. जास्त घामामुळे शरीर डिहायड्रेट होऊ शकते, ज्याचा थेट परिणाम त्वचेवर होतो. त्यामुळे दिवसभरात पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे.
तसेच, आहारात काकडी, टरबूज, खरबूज, टोमॅटो यांसारख्या पाणीदार फळे-भाज्यांचा समावेश करावा. हे पदार्थ त्वचेला आतून हायड्रेट ठेवण्यास मदत करतात.
घरच्या घरी बनवा प्रभावी फेस मास्क
कोरफड जेल फेस मास्क
कोरफडमध्ये नैसर्गिक मॉइश्चरायझिंग आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर कोरफड जेल लावून हलक्या हाताने मसाज करा. 20-30 मिनिटांनी धुवून टाका किंवा रात्रभर ठेवले तरी चालते. यामुळे त्वचा मऊ, स्वच्छ आणि तजेलदार होते.
कच्च्या दुधाचा फेस मास्क
कच्च्या दुधामध्ये असलेले लॅक्टिक ॲसिड त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यास मदत करते. कापसाच्या सहाय्याने चेहऱ्यावर दूध लावा आणि सुकल्यानंतर पुन्हा एक थर द्या. हा उपाय त्वचेचा काळेपणा कमी करून नैसर्गिक उजळपणा देतो.
तांदूळ आणि मध फेस मास्क
भिजवलेले तांदूळ वाटून त्यात मध मिसळा आणि ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. 10-15 मिनिटांनी धुऊन टाका. तांदूळ त्वचा स्वच्छ आणि उजळ करतो, तर मध त्वचेला आवश्यक ओलावा देतो.









