---Advertisement---
जळगाव : बंद घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तसेच कुलुप तोडुन चोरट्यांनी घरात प्रवेश केला. किमती मुद्देमालाच्या शोधात सामान अस्तव्यस्त करत तो फेकला. कपाट उघडुन सोन्याचांदीचे दागिने रोकड असा सुमारे दोन लाख ९२ हजार ५०० रुपयांचा ऐवज घेत चोरटे पसार झाले. गुरुवारी (२६ मार्च) सकाळी चार वाजेनंतर ही घटना पातोंडा (ता.चाळीसगाव) येथे उघडकीस आली.
बांधकाम रवींद्र वाल्मिक महाजन हे (वय ४२, रा. मुंदखेडा रोड, महादेव चौक पातोंडा) येथे कुटुंबासह वास्तव्यास असुन कॉन्ट्रक्टर म्हणून ते कार्यरत आहेत. ते बुधवारी (२५ मार्च) रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास राहत्या घराच्या दरवाजाला बाहेर गावी गेले होते. चोरट्यांचा या बंद घरावर डोळा गेला. दरवाजाचा कडीकोंडा व कुलूप तोडले. दरवाजातून घरात प्रवेश केला. त्यानंतर संपूर्ण घरात त्यांनी मुद्देमालाचा शोधात सामान अस्तव्यस्त केला. कपाट उघडत चोरट्यांनी सोने चांदीचे दागिने तसेच रोकड घेत पलायन केले.
महाजन हे गुरुवारी पहाटे घरी आले असता त्यांना दरवाजाचा कुलुप व कोंडा तुटलेला दिसला. घरात प्रवेश करतात सर्वत्र सामान अस्तव्यस्त पडलेला त्यांना आढळला. कपाटातील मुद्देमाल दिसला नाही. चोरट्यांनी दागिने व रोकड असा २,९२,५०० चा मुद्देमाल चोरुन नेला. घटनेची माहिती महाजन तत्काळ पोलिसांना देत तक्रार दिली. पोलीस निरीक्षक अमित यांनी कुमार मनेळ यांनी घटनास्थळी जावुन प्रकार जाणुन घेतला. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले हे तपास करीत आहेत.









