धनादेश अनादर प्रकरणात कडक शिक्षा! सोयगाव न्यायालयाचा आरोपीला १ वर्ष कारावास, ८ लाख दंड

---Advertisement---

 

सोयगाव तालुक्यात धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणात न्यायालयाने कडक भूमिका घेत आरोपीला शिक्षा सुनावली आहे. कर्जफेडीसाठी दिलेला धनादेश बँकेत अनादरित झाल्याप्रकरणी न्यायालयाने आरोपीला एक वर्ष सश्रम कारावास आणि आठ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

सचिन मधुकर महालपुरे (रा. गोंदेगाव, ता. सोयगाव) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्यांनी गोंदेगाव येथील श्री सदगुरू ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित येथून २ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले होते.

कर्जफेडीसाठी आरोपीने पतसंस्थेला ५ लाख ८ हजार ५०० रुपयांचा धनादेश दिला होता. मात्र, हा धनादेश जिल्हा सहकारी बँकेच्या गोंदेगाव शाखेत वटवण्यासाठी सादर केल्यावर खात्यात पुरेशी रक्कम नसल्याने तो अनादरित (बाऊन्स) झाला.

यानंतर पतसंस्थेकडून आरोपीला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली होती. तरीही आरोपीने कोणताही प्रतिसाद दिला नाही. अखेर पतसंस्थेचे वसुली अधिकारी शंकर पंढरीनाथ निकम यांनी न्यायालयात कलम १३८ अंतर्गत खटला दाखल केला.

या प्रकरणात पतसंस्थेच्या वतीने ॲड. राजेश गिरी आणि ॲड. सचिन गिरी यांनी युक्तिवाद केला. सादर केलेल्या पुराव्यांवर आणि साक्षीदारांच्या जबाबांवरून न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले.

न्यायालयाने आरोपीला एक वर्ष सश्रम कारावासासोबतच ८ लाख रुपयांचा दंड ठोठावला असून, दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे.

या निर्णयामुळे थकबाकीदारांमध्ये खळबळ उडाली असून, आर्थिक व्यवहारात जबाबदारीचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---