पिंपळनेर-साक्री महामार्गावर व्हॅनने घेतला पेट; अत्यंत थरारक घटनेत कारमधील तिघे बचावले…

---Advertisement---

 

पिंपळनेर-साक्री महामार्गावरील सामोडे गावाजवळ प्रवाशांनी भरलेल्या ओम्नी व्हॅनने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेत संपूर्ण व्हॅन जळून खाक झाली आहे.

पिंपळनेरहून सामोडेकडे जात असलेल्या या व्हॅनमध्ये तीन जण प्रवास करत होते. आग लागल्याचे लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखत तत्काळ वाहन थांबवून तिघे जण वाहनाबाहेर निघाले. त्यामुळे सुदैवाने मोठा अनर्थ टळला आणि सर्वजण सुखरूप बचावले. प्राथमिक तपासात वाहनाच्या वायरिंगमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान तीव्र स्वरूपाचे वाढत्या  तापमानामुळे सदर घटना घडल्याची शक्यता वर्तवली जात आहे.घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलीस व बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेमुळे महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

सदर घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र वाहन पूर्णपणे जळून खाक झाले आहे. तर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---