गौताळा घाटात भीषण अपघात; उसतोड मजुरांचे वाहन १०० फूट दरीत कोसळले, १३ जण जखमी….!

---Advertisement---

 

कन्नड तालुक्यातील गौताळा घाटात उसतोड मजुरांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात आयशर वाहन सुमारे १०० फूट खोल दरीत कोसळल्याने एकच खळबळ उडाली असून ७ जण गंभीर जखमी तर ६ जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

ही दुर्घटना शनिवारी (दि. २९) सकाळच्या सुमारास गौताळा अभयारण्य परिसरातील कन्नड- नगर मार्गावर घडली. दस्तापूर येथील काही उसतोड मजूर बारामती येथे कामासाठी गेले होते. काम पूर्ण करून ते आयशर वाहन (एमएच २१ बीएच ०४८२) द्वारे आपल्या गावी परतत असताना हा भीषण अपघात घडला.

माहितीनुसार, गौताळा घाटातील धोकादायक वळणावर वाहनाचे ब्रेक अचानक निकामी झाले. त्यामुळे चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहन वेगाने पुढे जात संरक्षण भिंतीला धडकले. त्यानंतर वाहनाने दोन पलट्या घेत थेट सुमारे १०० फूट खोल दरीत कोसळले. या अपघाताची तीव्रता इतकी होती की वाहनातील अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना दरीतून बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. त्यानंतर सर्व जखमींना तातडीने कन्नड ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी घाटी रुग्णालय येथे हलविण्यात आले आहे.

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून घाटातील धोकादायक वळणांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर या मार्गावर सुरक्षेच्या उपाययोजना वाढवण्याची मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---