शिंदखेडा तालुक्यात मार्च महिन्यातच पाणी टंचाईचं संकट; महिलांची पाण्यासाठी वणवण, गोधन वाचवायचं कसं ? शेतकरी चिंतेत….!

---Advertisement---

 

मार्च महिन्यातच उष्णतेच्या तीव्र लाटेने अंगाची लाही लाही होत असतांना उन्हाच्या झळांसोबतच शिंदखेडा तालुक्यातील डाबली व धांदरणे येथील विहिरीचा जलसाठा कमी झाला आहे. परिसरातील नदी-नाले तर कधीच कोरडेठाक झाले आहेत. डाबली व धांदरणे ग्रामीण भागातील नागरिकांना, महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.

शिंदखेडा तालुक्यातील डाबली व धांदरणे येथील सरपंच व ग्रा. पं. अधिकारी श्रीमती एम. डी. पाटील यांनी पं. स. शिंदखेडा येथील पाणीपुरवठा विभागास मार्च १६ व २३ तारखेला या ठिकाणी टँकरच्या फेऱ्या सुरू कराव्यात अशा आशयाचे पत्र देखील दिले. परंतु प्रशासन दुर्लक्ष करत असुन या दोन्ही गावातील महिलांचा व लहान मुलांचा संपूर्ण दिवस पाण्यासाठी पायपीट करण्यात जात असतो. पाण्याविना जनावरांचे प्रचंड हाल सुरू असून गोधन वाचवावे कसे….? या चिंतेत शेतकरी आहे. उन्हाळ्यापूर्वी पाण्यासाठीची कोणतीच तजवीज पाणीपुरवठा विभाग करीत नसल्याने नागरिकांचा असंतोष दिसून येत आहे.

डाबली धंदराणे येथे पिण्याच्या पाण्यासाठी तब्बल १० ते १२ दिवस नागरिकांना वाट पहावी लागत आहे. तापमानात वाढ झाल्याने पाणी टंचाईचे सावट भीषण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदखेडा तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा बसायला सुरुवात झाली. ग्रामीण भागात विहिरी, कुपनलिका यांनी सुद्धा तळ गाठल्यामुळे नागरिकाना पाणी टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहे.

दरम्यान पुढील एक ते दीड महिन्यात अजून पाणीटंचाई वाढण्याची शक्यता असल्याने टँकरची व्यवस्था लवकरात लवकर व्हावी. प्रशासनाकडून विहरीचे अधिग्रहण लवकर करण्यात आले आहे. पाणीसाठा शिल्लक कमी झाला असला तरी नागरिकांनी पाणी जपून वापरावे असं आवाहन ग्रामपंचायत प्रशासनाने केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---