---Advertisement---
धुळे शहरातील देवपूर भागातील दोंदे कॉलनीतील भारतगॅस एजन्सीत आज सकाळीभीषण आग लागल्याची घटनाघडली. भर वस्तीमध्ये लागलेल्या आगीमुळे काही काळ परिसरातभीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र स्थानिकांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच शुभम पाटील या तरुणाने अग्निशामक दलासह नगरसेवकललित माळी यांना कळवले.
दरम्यान, परिसरातील नागरिकांनी धाव घेत आगीवर प्राथमिक नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. काही वेळातच मनपाच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहोचून आग पूर्णपणे आटोक्यात आणली. वेळीच आग नियंत्रणात आल्याने जीवितहानी टळली. पंरतू आगित एजन्सीमधील एसी, कॉम्प्युटर, कागदपत्रे असे साहित्य जळाल्याचे सांगितले जात आहे.
शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच देवपूर पोलिस ठाण्याचे निरीक्षक समाधान वाघ, पश्चिम देवपूरचे पोलिस उपनिरीक्षक कौठुळे यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली. तसेच विज वितरण कंपनीचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून तपासणी केली जात आहे. गॅस एजन्सीचे हे केवळ कार्यालय असून या ठिकाणी सिलींडर ठेवले जात नाहीत. गोडावून दुसऱ्या ठिकाणी असून आगीत एसी, कॉम्प्युटर, डॉक्युमेंट जळाले असल्याचे मालक सांगत आहे.
दरम्यान, गॅस एजन्सीच्या या कार्यालयात अग्निसुरक्षा यंत्रणा होती का, तसेच नियमित तपासणी होते का, याबाबत चौकशीची मागणी होत आहे. याबाबत दुपारी पश्चिम देवपूर पोलिसात नोंद करण्याचे काम सुरू होते.









