शिवव्याख्याते, प्रबोधनकार मधुकर महाराज बारूळकर यांचे अपघाती निधन; नांदेडमध्ये शोककळा…!

---Advertisement---

 

नांदेड जिल्ह्यातून एक अत्यंत दु:खद घटना समोर आली असून बहुजन चळवळीचे ज्येष्ठ अभ्यासक आणि शिवव्याख्याते, प्रबोधनकार हभप मधुकर महाराज बारूळकर यांचे रस्ते अपघातात निधन झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड शहरातील ढवळे कॉर्नर परिसरात हा भीषण अपघात घडला. एका कार्यक्रमानंतर महाराज दुचाकीने आपल्या गावी परतत असताना पाठीमागून येणाऱ्या भरधाव टिप्परने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जबर होती की त्यांचा जागीच मृत्यू झाला.

मधुकर महाराज बारूळकर हे शिवव्याख्याते आणि पुरोगामी विचारवंत म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या अचानक जाण्याने सामाजिक, प्रबोधन आणि बहुजन चळवळीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

दरम्यान, राज्यात इतर ठिकाणीही अपघातांच्या घटनांमुळे जीवितहानी झाल्याने रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---