संजय राऊत यांचा मोठा दावा —अजित पवार व शिंदे गटातील आमदार भाजपमध्ये विलीन होण्याची शक्यता

---Advertisement---

 

मुंबई (2 एप्रिल 2026) : राष्ट्रवादी अजितदादा पवारांचा 25 ते 30 आमदारांसह भाजपमध्ये विलीन होईल त्यासोबतच शिंदेंचेही 25 ते 30 आमदार भाजपमध्ये विलीन होतील, त्यांची तशी मानसिकता आहे, असा दावा उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. सुनेत्रा पवार यांचा पक्ष वेगळा आहे. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे अजित पवार यांचे सहकारी होते मात्र ते सुनेत्रा पवारांचे सहकारी असतीलच असे नाही. त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत गोष्टीवर दुसऱ्या पक्षाने का बोलावे. त्यांनी पत्रात काय लिहले हा त्यांचा विषय असल्याचेही खासदार राऊत म्हणाले.

काय म्हणाले नेमके राऊत ?

खासदार संजय राऊत म्हणाले की, त्या आमदारांना काळी काळ थांबवण्यासाठी सांगण्यात आले आहे. या दोन्ही पक्षाला भाजपमध्ये विलीन व्हावेच लागेल. शिवसेना पक्ष-चिन्हावरील सुनावणी प्रत्येकवेळी पुढे ढकलली जाते. मग सुप्रीम कोर्टावर विश्वास कोणठेवणार? 50-50 वेळा घटनात्मक पीठ असलेल्या खटल्याच्या सुनावण्या पुढे ढकलल्या जातात. हे काम मुख्य न्यायाधीश करतात. हे नरेंद्र मोदी, अमित शहांचे गुलाम झाले आहे. या प्रकरणी एकदाच निर्णय देता येत नाही का? असा सवाल राऊत यांनी केला आहे.
सुप्रीम कोर्टावरच संशय

संजय राऊत म्हणाले की, न्याय व्यवस्था ही राजकारण्याच्या दबावाखाली आहे तसे नसते तर गौतम अदानींच्याविरोधात इतके खटले सुप्रीम कोर्टात गेले आणि एकाही खटल्यात ते हरले नाही. शिवसेना, राष्ट्रवादीच्या सुनावणीसंदर्भात विचार केला तर ते गंभीरपणे घेतले जात नाही. न्यायाधीशांना दबाव असेल तर सांगितले पाहिजे. यावर काहीतरी उत्तर मिळावे म्हणून आम्ही कोर्टात गेलो आहोत. निवडणूक आयोगावर संशय घेता येत नाही, असे म्हणणाऱ्या सुप्रीम कोर्टावरच संशय यायला लागला आहे. संविधानिक संस्थेवरच लोकांना संशय येत आहे. अनेक राज्यात बोगस मतदान झाले. त्याच पद्धतीने पश्चिमबंगालमध्ये होणार. नाही तर कोण एकनाथ शिंदे त्यांचे इतके उमेदवार कसे विजयी होतात.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---