प्रतीक्षा संपली! देऊळ बंद २ २१ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

---Advertisement---

 

मराठी चित्रपटप्रेमींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. बहुप्रतीक्षित देऊळ बंद २ हा चित्रपट येत्या २१ मे २०२६ रोजी प्रदर्शित होणार असून, प्रेक्षकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे.


सन २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या देऊळ बंद या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवत प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते. अध्यात्म आणि विज्ञान यांचा संगम मांडणाऱ्या या चित्रपटाच्या कथानकाला मोठी पसंती मिळाली होती.


या यशानंतर प्रेक्षकांकडून सातत्याने सिक्वेलची मागणी होत होती. अखेर लेखक-दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांनी ही मागणी पूर्ण करत ‘देऊळ बंद २’ची घोषणा केली. नुकतेच चित्रपटाचे डिजिटल पोस्टर प्रदर्शित करण्यात आले असून “आता परीक्षा देवाची” या उपशीर्षकामुळे कथेबाबत उत्सुकता आणखी वाढली आहे.


चित्रपटाची निर्मिती कैलाश वाणी, जयश्री कैलाश वाणी, कैवल्य वाणी आणि जुईली वाणी सूर्यवंशी यांनी केली आहे. मात्र, चित्रपटातील कलाकारांची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत.


२१ मे रोजी प्रदर्शित होणारा ‘देऊळ बंद २’ पुन्हा एकदा प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडणारी कथा घेऊन येणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---