भूकंपाच्या धक्याने मराठवाड्यासह विदर्भ हादरला

---Advertisement---

 

आज सकाळी विदर्भ आणि मराठवाडा भागात काही ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सकाळी ८ वाजून ४५ मिनिटांच्या सुमारास हे धक्के बसले. वाशिम शहरासह आसपासच्या परिसरात, तसेच यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील शेबाळपिंपरी भागात नागरिकांना जमीन हलल्याचं लक्षात आलं.

नांदेड शहरासह आसपासच्या परिसरात हा धक्का थोड्या उशिराने, सुमारे ८ वाजून ४६ मिनिटांनी जाणवला. अनेकांनी सांगितले की, भूकंपाच्या वेळी जमिनीखालून आवाज आल्यासारखे वाटले आणि त्यानंतर काही क्षण हलकासा कंप जाणवला.

या घटनेमुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही नागरिक खबरदारी म्हणून घराबाहेर आले होते. मात्र, परिस्थिती लवकरच पूर्ववत झाली. सुदैवाने या धक्क्यांमुळे कोणतीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाले नाही.

दरम्यान, राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून (NCS) अद्याप या भूकंपाची तीव्रता किंवा केंद्रबिंदू याबाबत अधिकृत माहिती मिळालेली नाही. स्थानिकांच्या म्हण्यानुसार हे धक्के अतिशय सौम्य स्वरूपाचे असल्याचे दिसून येते. विदर्भ आणि मराठवाडा हा भूकंपप्रवण पट्टा मानला जात असल्याने अशा हलके धक्के अधूनमधून जाणवत असतात. प्रशासनाने नागरिकांना अफवांपासून दूर राहण्याचे आणि सतर्कतेचे आवाहन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---