केंद्रसरकारचे डिझेलवर निर्बंध; एका वाहनाला दिवसाला फक्त 200 लिटर इंधन मिळणार…!

---Advertisement---

 

देशातील डिझेल टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारने इंधन विक्रीवर तात्पुरते निर्बंध लागू केले आहेत. नव्या आदेशानुसार, कोणत्याही वाहनाला एका दिवसात 200 लिटरपेक्षा जास्त डिझेल विकता येणार नाही. ९० दिवसांपर्यंत निर्बंध लागू असणार आहे .

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने यासंदर्भात आदेश जारी केला असून साठेबाजी, काळाबाजार आणि अनधिकृत वापर रोखण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहेत. पेट्रोलपंपावरून खरेदी केलेल्या डिझेलची पुनर्विक्री करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.साठेबाजी आणि काळाबाजाराविरोधात कडक कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. महाराष्ट्र सरकारने नवीन आदेशानुसार निर्बंध लागू केले आहेत.

सरकारने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार असून अधिकाऱ्यांना तपासणी आणि जप्तीचे अधिकार देण्याचाही विचार सुरू आहे.
हा आदेश सध्या मर्यादित कालावधीसाठी लागू करण्यात आला असून त्याचा सर्वाधिक परिणाम मालवाहतूक क्षेत्रावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---