होर्मुझ सामुद्रधुनी खुली होण्याचे संकेत; ट्रम्प यांचा मोठा दावा, आठवड्याअखेरीस कराराची शक्यता…!

---Advertisement---

 


इराणने अण्वस्रांची निर्मिती व त्यांची साठवणूक करणार नाही, या अमेरिकेच्या मुख्य अटीला मान्यता दिली त्यामुळे युद्ध थांबवत असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. आमची महत्त्वाची हीच अट होती म्हणून आम्ही युद्ध केले असे ट्रम्प म्हणाले. विशेष म्हणजे, इराणच्या तेल उद्योगावर ताबा मिळवण्याची आणि कठोर लष्करी कारवाई करण्याची धमकी दिल्यानंतर अवघ्या काही तासांतच ट्रम्प यांनी हल्ल्यांचे आदेश मागे घेत शांतता चर्चेत मोठी प्रगती झाल्याचे जाहीर केले.

व्हाइट हाऊसमधील ओव्हल ऑफिसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, हा करार युरोपमध्ये होणार असून या करारावर स्वाक्षरी करण्यासाठी उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हान्स उपस्थित राहणार आहेत. या कराराबाबत आपण कतार, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, बहरीन, कुवेत आणि पाकिस्तानसह अनेक मध्यपूर्वेतील देशांच्या नेत्यांशी चर्चेच्या ताज्या फेरीबाबत संवाद साधला आहे, असे ट्रम्प म्हणाले.

होर्मुझ सामुद्रधुनीतून बाहेर पडणाऱ्या भारतीय जहाजांवर इराणनेच ड्रोन हल्ला केल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी केला. या हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो असेही ते म्हणाले. या आठवड्यात ओमान किनाऱ्याजवळ भारतीय कर्मचाऱ्यांसह तीन व्यापारी जहाजांवर हल्ले झाले. त्यापैकी एका हल्ल्यात बुधवारी तीन भारतीय सागरी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. अमेरिकी लष्कराने केलेले हे हल्ले घातक, जीवघेणे असल्याची संतप्त भावना भारताने शुक्रवारी अमेरिकेचे प्रभारी राजदूत जेसन मीक्स यांच्याकडे व्यक्त केली. तसेच या हल्ल्यांचा तीव्र निषेधही केला.

इराण सोबत होत असलेला हा करार अत्यंत मजबूत सामंजस्य असेल. तो सध्या काहीसा संकल्पनात्मक वाटू शकतो, पण तो निश्चितपणे पूर्ण होणार आहे. हा अतिशय तपशीलवार करार आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले. इराणने करारासाठी सहमती का दर्शवली, या प्रश्नावर ट्रम्प म्हणाले, त्यांनी अत्यंत मोठे नुकसान सोसले आहे. त्यामुळे त्यांना हा करार माझ्यापेक्षा जास्त हवा आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---