अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांच्या यावलमध्ये गाठीभेटींनी राजकीय चर्चांना उधाण; भाजप व महाविकास आघाडीच्या नगरसेवकांशी संवाद…

---Advertisement---

 

जळगाव विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी यावल शहरात विविध पक्षांच्या नगरसेवकांच्या गाठीभेटी घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भाजप, महायुती तसेच महाविकास आघाडीशी संबंधित नगरसेवकांशी त्यांनी स्वतंत्रपणे संवाद साधल्याने स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.

यावल येथील शेतकी संघाच्या सभागृहात अनिल चौधरी यांनी भाजप व महायुतीच्या नगरसेवकांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत नगरसेवकांनी त्यांचा सत्कार केला तसेच विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले जाते. बैठकीतील चर्चेचे स्वरूप गोपनीय ठेवण्यात आल्याने राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना वाव मिळत आहे.

यानंतर अनिल चौधरी यांनी उबाठा नगराध्यक्ष छाया पाटील यांच्या निवासस्थानी भेट देत महाविकास आघाडीच्या नगरसेवकांशी देखील चर्चा केली. या भेटीदरम्यान स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या विधान परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून नंदकिशोर महाजन, उबाठाकडून शरद तायडे तर अपक्ष म्हणून अनिल चौधरी हे मैदानात आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील नगराध्यक्ष, नगरसेवक व स्वीकृत सदस्य असे मर्यादित मतदार मतदान करणार असल्याने प्रत्येक मताला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

जळगाव विधान परिषद निवडणूक प्रचारादरम्यान उमेदवारांनी विविध लोकप्रतिनिधींच्या भेटी घेणे ही सामान्य बाब असली तरी सर्व पक्षांच्या नगरसेवकांना एकत्रितपणे बैठकीसाठी आमंत्रित करणे आणि त्यास सकारात्मक प्रतिसाद मिळणे, यामुळे या भेटींची विशेष चर्चा होत आहे. अनिल चौधरी यांच्या या राजकीय गाठीभेटी आगामी मतदानाच्या गणितावर कितपत परिणाम करतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---