---Advertisement---
मुंबई : नाशिकमधील धर्मांतर प्रकरण गंभीर असून, यात सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई केली जाईल. या मॉड्युलचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचले आहेत, याचा तपास आम्ही करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, एका मॉड्यूल अंतर्गत हिंदू नागरिकांचा छळ करण्यात आला. टीसीएस कंपनीने देखील कडक भूमिका घेतली असून, कुणालाही पाठीशी न घालण्याचे त्यांनी स्पष्ट केले. या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत पोहोचले आहेत, याचा तपास आम्ही करू. आम्ही केंद्रीय तपास यंत्रणांनाही या प्रकरणाची माहिती दिली आहे आणि आवश्यकतेप्रमाणे त्यांची मदतही घेतली जाईल.
या प्रकरणात आतापर्यंत एकूण ९ जणांवर एफआयआर दाखल झाला आहे. यामध्ये दानिश शेख, तौसीफ अत्तार, रझा मेमन, शाहरुख कुरेशी, शफी शेख, आसिफ आफताब अन्सार आणि शाहरुख शेख यांच्यासह एका महिलेचा समावेश असून त्यांना अटक करण्यात आली आहे. निदा खान ही एकमेव आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही. तिच्या पुणे येथील घराचीही तपासणी करण्यात आली, मात्र तिथे आढळली नाही.









