ममतादीदींचा बालेकिल्ला झाला भगवा! दिल्लीत जल्लोषाचे वातावरण

---Advertisement---

 

नवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीदरम्यान समोर येणारे कल देशातील राजकीय समीकरणात वेगाने बदल घडवत असल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष प्रथमच सत्तेच्या जवळ पोहोचत असल्याचे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील पक्ष मुख्यालयात उत्साहाचे वातावरण असून, विजयाच्या तयारीलाही सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी साडेसहा वाजता मुख्यालयात येऊन कार्यकर्त्यांना संबोधित करणार असल्याची माहिती आहे.

सुरुवातीच्या मतमोजणीच्या कलांनुसार पश्चिम बंगालमध्ये भाजपने आघाडी घेतली असून तृणमूल काँग्रेस मागे पडताना दिसत आहे. या घडामोडींमुळे राज्यातील सत्तेचे चित्र बदलू शकते, अशी चर्चा रंगू लागली आहे. सीमावर्ती भाग, आदिवासी क्षेत्रे आणि औद्योगिक पट्ट्यात भाजपची पकड वाढताना दिसते, तर तृणमूल काँग्रेस काही शहरी भाग आणि पारंपरिक मतदारसंघांमध्ये टिकून आहे.

ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही निवडणूक सत्तेची सलग तिसरी संधी टिकवण्याची मोठी परीक्षा मानली जात आहे. दुसरीकडे, भाजपने जोरदार प्रचार मोहीम राबवत विजयाच्या दिशेने वाटचाल केल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. भवानीपूर मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळत असून, सुरुवातीला मागे असलेल्या ममता बॅनर्जी यांनी नंतर आघाडी घेतल्याचे समोर आले आहे. मतमोजणी पुढे सरकत असताना अंतिम निकाल काय लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---