नगराध्यक्षा गायत्री भंगाळेंचा मोठा गौप्यस्फोट? आजोबांच्या जुन्या नोंदीत फेरफार झाल्याचा गंभीर आरोप, पोलिसात तक्रार दाखल….!

---Advertisement---

 

भुसावळ नगरपालिकेच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. भुसावळच्या नगराध्यक्ष गायत्री चेतन भंगाळे यांच्या आजोबांच्या नगरपालिकेत असलेल्या जुन्या नोंदीत फेरफार झाल्याचा गंभीर आरोप करत थेट पोलिसांत धाव घेतली असून भुसावळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तक्रारीनंतर भुसावळ शहरातील राजकीय वातावरण तापले असून, नगरपालिका प्रशासनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, गायत्री भंगाळे यांचे आजोबा प्रेमनाथ कामता प्रसाद हे १९४९ साली रेल्वे सेवेत दाखल झाल्यानंतर भुसावळ येथे राहत होते. त्यांच्या नावाची नोंद शिवाजीनगर परिसरातील नगरपालिका असेसमेंट रेकॉर्डमध्ये असल्याचा दावा करण्यात आला आहे.

१९५० ते १९८४ या कालावधीतील काही दस्तऐवज जात वैधता पडताळणी प्रक्रियेसाठी वापरण्यात आले होते. मात्र, या कागदपत्रांमध्ये फेरफार झाल्याचा उल्लेख दक्षता समितीच्या पडताळणीत समोर आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

यामुळे संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, दस्तऐवजांमध्ये खाडाखोड करण्यामागे काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे संगनमत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

गायत्री भंगाळे यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे. मात्र, या कथित फेरफार प्रकरणामुळे भुसावळमध्ये एकच खळबळ उडाली असून, पोलिसांकडून तक्रारीची पडताळणी सुरू असल्याची माहिती समोर येत आ

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---