टरबूज खाल्ल्याने ४ जणांच्या मृत्यूमुळे नागरिकांमध्ये भीती; टरबूजच्या विक्रीत तब्बल ३०% घट….!

---Advertisement---

 

जळगाव : उन्हाळ्याचा तडाखा वाढल्याने जिल्ह्यात टरबूजाची मोठी आवक झाली आहे, मात्र टरबूजला अफवांच्या ग्रहणाने ग्रासले आहे. गेल्या महिन्यात दक्षिण मुंबईत एका कुटुंबातील चार सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांनी रात्री टरबूज खाल्ले असल्याने मृत्यू झाल्याची चर्चा सुरुवातीला होती. या चर्चेमुळे त्याचे थेट पडसाद आता जळगावच्या बाजारपेठेत उमटताना दिसत आहेत. जळगाव शहरात टरबुजाची विक्री तब्बल २० ते ३० टक्क्यांनी घटली आहे.

कडाक्याच्या उन्हातही ग्राहक टरबूज खरेदी करताना विचार करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दक्षिण मुंबईतील पायधुनी परिसरातील त्या घटनेबाबत कलिना येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीच्या अहवालात मृत व्यक्तींच्या शरीरात उंदीर मारण्याच्या औषधाचे आणि मॉर्फिनचे अंश आढळले असून, या मृत्यूचा टरबूजशी कोणताही संबंध नसल्याचे आता स्पष्ट झाले आहे. असे असूनही, या घटनेचा मोठा परिणाम बाजारपेठेवर दिसून येत आहे.

दरम्यान, आम्ही कडक उन्हात रक्ताचे पाणी करून टरबूज पिकवतो. मात्र अशा अफवांमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होतेय. अशी प्रतिक्रिया सध्या टरबूज उत्पादक शेतकऱ्यांनी दिली आहे. तसेच मुंबईच्या घटनेची बातमी पसरल्यापासून ग्राहक टरबूज घ्यायला घाबरत आहेत. उन्हाळा असूनही आमची विक्री ३० टक्क्यांनी घटली आहे. असं टरबूज विक्रेते सांगत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---