पाचोऱ्यात ऑनलाईन कल्याण मटका जुगारावर पोलिसांची छापा; 89 हजाराचे जुगाराचे साहित्य जप्त; मुख्य आरोपी फरार…!

---Advertisement---

 

पाचोरा शहरातील रामानंद नगर भागात एका बंद पत्रांच्या गोडाऊनवर ऑनलाईन कल्याण मटका जुगारावर पोलिसांनी अचानक छापा मारुन 89 हजार रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य  जप्त केले आहे.या कारवाई दरम्यान एक ही व्यक्ती पोलिसांच्या हाती न आल्याने पोलिसांप्रति आश्चर्य व्यक्त होत आहे

या बाबत सविस्तर वृत्त असे की,पाचोरा शहरातील रामानंद नगर भागात पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नुकतीच एका पत्राच्या गोडाऊन मध्ये ऑनलाइन कल्याण मटका सुरू असल्याने सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला असता या ठिकाणी 89 हजार 260/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरील कारवाई ही सुनील देवराम भोई याच्यावर पिंपळगाव (हरेश्वर) पोलिसांनी कारवाई केली असता सुनील भोई याकडून पिंपळगाव पोलिसांना माहिती देण्यात आली होती की,पाचोऱ्यात संतोष पाटील नामक इसम हा स्वतःच्या फायद्यासाठी मोबाईल फोनवरून ऑनलाइन जुगार चालवीत होता पोलिसांनी छापा मारला असता जुगाराचे साहित्य  तर घटनास्थळी आढळून आले मात्र गोडाऊन मध्ये कार्यरत कर्मचारी पळून जाण्यात यशस्वी  झाले.                   

या कारवाईत 89, हजार 260 रुपये किमतीच मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.यात 40 हजार रुपये किंमतीचे 4 प्रिंटर्स, 30 हजार 500 रुपये किमती 61 मोबाईल संच, 6 हजार रुपये किमतीचे प्रिंटर्स कॅल्क्युलेटर पेन नोटबुक असे साहित्य जप्त करण्यात आले आहे.दरम्यान मटका किंग संतोष पाटील सह इतर साथीदार घटनास्थळावरून पसार झाले असून सदर कारवाई संदर्भात पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशन येथे कार्यरत पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल रामनाथ पवार यांनी दिलेल्या फिर्याद वरून  आरोपी संतोष पाटीलसह इतर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील कारवाई ही पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

एकीकडे अधिकारी सह पोलिसांनी केलेल्या कारवाई चे कौतुक केले जात असून दुसरीकडे या कारवाई दरम्यान जप्त केलेल्या मुद्देमालातून महत्वाचा मुद्देमाल मटका चालविणाऱ्यास परत दिल्याची देखील बोलले जात आहे. तसेच गोडाऊनवर छापा पडण्यापूर्वीच मटका चालविणाऱ्यास माहिती प्राप्त झाल्याने घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले.यांना माहिती पुरविणारा तो म्होरक्या कौन असा प्रश्न या कारवाई वरून उपस्थित केला जात आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पाचोऱ्यात सुरू असलेल्या अवैध धंद्याकडे लक्ष वेधून कारवाई करावी अशी मागणी ही जोर धरू लागली आहे.आधीच अवैध धंद्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून पिंपळगाव (हरेश्वर)पोलीस स्टेशन हे चांगलेच गाजत आहे. वारंवार तक्रारी होत आहेत मात्र अवैध धंदे थांबता थांबत नसल्याचा प्रकार या पोलीस स्टेशन हद्दीत दिसून येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---