धरणगाव तालुक्यात नराधम शिक्षकाचे गैरकृत्य, चौथीतल्या विद्यार्थीनीचा लैंगिक छळ; पोलिसांनी आरोपी शिक्षकाला केली अटक…!

---Advertisement---

 

धरणगाव तालुक्यातील एका गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकानेच इयत्ता चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संशियत शिक्षकाला पोलिसांनी अटक केली असून धरणगाव पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यान्वये त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संबधीत पीडित अल्पवयीन विद्यार्थीनी आपल्या कुटुंबासह धरणगाव तालुक्यातील एका गावात राहते. तसेच स्थानिक जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथीत शिक्षण घेत आहे. तक्रारीनुसार, आरोपी शिक्षक मराठे हा विद्यार्थिनीला शाळा सुरू होण्यापूर्वी सकाळी सुमारे दहा वाजता झाडू मारण्याच्या बहाण्याने शाळेत बोलावून घेत असे व नको ते कृत्य तिच्यासोबत करत असे. सकाळी शाळेत कुणी नसल्याचा फायदा घेऊन तो तिच्यासोबत घृणास्पद कृत्य करत असे. इतकेच नव्हे तर तिला मोबाइलवर अश्लील व्हिडिओ दाखवून तिचा लैंगिक छळ करत असल्याचा संतापजनक प्रकारही उघडकीस आला आहे.

विद्यार्थिनीने घडलेली बाब आपल्या आईला सांगितल्यानंतर हा गंभीर प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरू केला असून आरोपी शिक्षक नंदलाल मराठे (रा. द्वारका नगर, जळगाव विरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात आली आहे. हा शिक्षक मागील दोन वर्षांपासून सातत्याने मुलीचे लैंगिक शोषण करत असल्याचं पीडितीने तीच्या पालकांना दिलेल्या माहितीनुसार पुढे आलं. शाळेची वेळ होण्यापूर्वी सकाळी बरोबर १० वाजता शाळेत झाडू मारण्यासाठी ये असा बहाणा करून त्याने चिमुकलीला एकांतात बोलावून घेतले आणि तिच्यावर अत्याचार केला. पीडितेने या कृत्यास विरोध करण्याचा प्रयत्न केला असता, तिला मारहाण करुन कोणाला काही सांगितले तर तुझे आई-वडील मरून जातील अशी भीती तिला घातली होती. 

३० एप्रिल २०२६ रोजी शाळेच्या शेवटच्या दिवशी देखील या नराधमाने तिच्यावर अत्याचार केला. सततच्या छळाला कंटाळून पीडित विद्यार्थीनेने अखेर हा प्रकार आपल्या पालकांना सांगितला. पालकांनी तातडीने धरणगाव पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. याप्रकरणी आरोपी नंदलाल मराठे (रा. द्वारका नगर, जळगाव) याच्याविरुद्ध पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास धरणगाव पोलीस करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---