पाचोऱ्यात जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन; पेट्रोल पंपांवर खुलेआम डिझेलच्या कॅन भरून विक्री, पंपावर गोंधळ…!

---Advertisement---

 

राज्यात पेट्रोल डिझेलची कमतरता भासत असतांना पाचोरा शहरातील पेट्रोल पंपांवर खुलेआम डिझेलची कॅनाभरून विक्री करतानाचे चित्र समोर आले आहे याकडे मात्र स्थानिक प्रशासनाचे सोयीस्कर रित्या दुर्लक्ष दिसून येत आहे.

देशाची आर्थिक परिस्थिती पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच राज्यातील नागरिकांना डिझेल, पेट्रोल चा वापर कमी करावा म्हणून आवाहन केले आहे. तसेच जळगाव जिल्हाधिकारी यांनी ही जिल्ह्यातील पेट्रोल पंप चालकांना कॅना भरून देऊ नये म्हणून आदेशीत केले आहे. मात्र या आदेशाचे पाचोऱ्यातील पेट्रोल पंपांवर उल्लंघन होतांना दिसून येत आहे. शहरातील काही पेट्रोल पंप पेट्रोल डिझेलच्या साठया अभावी बंद असून ज्या पेट्रोल पंपांवर साठा उपलब्ध होत आहे. ते खुलेआम आदेशाचे उल्लंघन करतांचे चित्र आहे. आणि स्थानिक प्रशासनाने याकडे सोयीस्कर रित्या दुर्लक्ष दिसून येत आहे.

पेट्रोल डिझेल चा शॉर्टेज असल्याने काही पेट्रोल पंप बंद आहेत तर ज्यांच्याकडे साठा उपलब्ध होत आहे त्या पेट्रोल पंपांवर वाहनासह कॅनाची मोठया रांगा दिसून येत आहेत. पेट्रोल पंपांवर लांबच लांब रांगा असतांना ग्राहक हे पेट्रोल पंप चालकांशी वाद घालतांना दिसून येत आहेत. व या वादविवादाचे रूपांतर हाणामारीत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पाचोरा शहरातील एका पेट्रोल पंपवर डिझेल साठी कॅना धारकांनी लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मात्र या दरम्यान नागरिकांनी  पेट्रोल पंप चालकांशी वाद घातल्याने या ठिकाणी राडा झाला सदर घटनेची माहिती पोलीस प्रशासनास मिळाल्याने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली व काही वेळानंतर पेट्रोल पंप सुरळीत चालू झाला.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---