भुसावळात भाजपला धक्का; माजी सभापती राजेंद्र चौधरी समर्थकांसह शिवसेनेत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण…!

---Advertisement---

 

भुसावळ : पंचायत समितीचे माजी सभापती तसेच भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी राजेंद्र चौधरी यांनी आपल्या प्रमुख समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश केल्याने भुसावळ तालुक्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. स्थानिक पातळीवरील मतभेद आणि पक्षांतर्गत नाराजीमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

नाशिक येथे आयोजित बैठकीत राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

भुसावळ पंचायत समितीचे माजी सभापती तसेच भाजपचे ज्येष्ठ पदाधिकारी राजेंद्र चौधरी यांच्यासोबत विविध क्षेत्रातील पदाधिकारी, माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते तसेच युवक कार्यकर्त्यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.

राजकीय समीकरणांमध्ये बदल घडवणारा हा पक्षप्रवेश असल्याची चर्चा असून भुसावळ तालुका आणि रावेर लोकसभा मतदारसंघातील आगामी राजकारणावर याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेत झालेल्या या मोठ्या पक्षप्रवेशामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात आणखी काही महत्त्वाचे नेते पक्षात प्रवेश करणार असल्याचे संकेतही यावेळी देण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---