---Advertisement---
यावल शहरात बुधवारी रात्री व गुरूवारी पहाटे यावल पोलिसांच्या पथकाने मुस्लिम बहुल भागात कोंबिंग ऑपरेशन केले, यात डांगपुरा, मन्यार वाडा, कुरेशी मोहल्ला भागातून कत्तलीच्या उद्देशातुन बांधुन ठेवलेले ८ गोवंश हस्तगत करण्यात आले व पंचानामा करीता सर्व गोवंश हे गोशाळेत पाठवण्यात आले आहे. तर या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात ४ जणांविरूध्द प्राणी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे,सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार वाढवे,पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन, सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे, हवालदार मोहन तायडे सह पथकाने शहरातील मुस्लिम बहुल भागात यात प्रामुख्याने डांगपुरा, मन्यार वाडा, कुरेशी मोहल्ला या भागात कोंबींग ऑपरेशन राबवले. या त्यांनी कत्तलीच्या उद्देशातुन बांधुन ठेवलेले ८ गोवंश हस्तगत केले. ही कारवाई बुधवारी मध्यरात्री व गुरूवारी पहाटे करण्यात आली होती.
या कारवाईत शहरातील संपुर्ण परिसर पोलिसांनी पिंजून काढला तर या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात हवालदार मोहन तायडे यांच्या फिर्यादी वरून सैय्यद रशीद उर्फ लच्छू कुरेशी, सैय्यद आसिफ कुरेशी, सैय्यद अन्सार कुरेशी व सैय्यद निसार कुरेशी या चार जणांविरूध्द प्राणी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार करीत आहे.
यावल शहर व तालुक्यात कुठे ही जर कत्तलीच्या उद्देशातुन गोवंश लपवलेले असेल, किंवा अवैद्य गोवंशस वाहतुककेली जात असेल तर या बाबत पोलिसांना माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनिय ठेवले जाईल असे आवाहन यावल पोलिस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांनी केले आहे.









