---Advertisement---
नीट पेपरफुटी प्रकरणामुळे रद्द झालेल्या NEET UG 2026 पुनर्परीक्षेबाबत नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने महत्त्वाचा असा निर्णय घेतला आहे. 21 जून 2026 रोजी होणाऱ्या NEET UG पुनर्परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना अतिरिक्त 15 मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे. त्यामुळे परीक्षेचा कालावधी 180 मिनिटांवरून 195 मिनिटांचा झाला आहे.
सुधारित वेळापत्रकानुसार परीक्षा दुपारी 2:00 ते 5:15 या वेळेत होईल. तसेच विद्यार्थ्यांना रफ वर्कसाठी अधिक जागा उपलब्ध करून देण्यात आली असून प्रश्नपत्रिकेतील रफ कामाची पाने 2 वरून 4 करण्यात आली आहेत. अपवादात्मक परिस्थितीत ही पुनर्परीक्षा घेतली जात असल्याने विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पुनर्परीक्षेसाठी विध्यार्थ्यांकडून कोणती फी आकारली जाणार नाही आहे असं NTA कडून स्पष्ट करण्यात आल आहे. परीक्षेचे ऍडमिट कार्ड लवकरच NTA च्या अधिकृत वेबसाइड वर उपलब्ध होईल.
पुनर्परीक्षा का होत आहे?
3 मे रोजी झालेल्या NEET परीक्षेनंतर पेपरफुटीच्या आरोपांमुळे देशभरात वाद निर्माण झाला होता. चौकशीनंतर परीक्षा रद्द करण्यात आली आणि पुनर्परीक्षा घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.









