भुसावळ फैजपुर मार्ग दुरुस्तीसाठी महिनाभर बंद, वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करा, प्रशासनाचे आवाहन…

---Advertisement---

 


आशियाई विकास बँकेच्या वतीने अर्थसहाय्यित महाराष्ट्र रस्ते सुधारणा प्रकल्पांतर्गत विटवा, भुसावळ, जामनेर, मोठाळा, तरवाडी फाटा या राज्य मार्ग फैजपूर, क्रमांक ४४ वरील रस्त्याचे काम सुरू आहे. विटवा, भुसावळ, जामनेर, फैजपूर, मोठाळा, तरवाडी फाटा या रस्त्याचे रस्ते सुधारणा प्रकल्पांतर्गत काम सुरू असल्याने १७ जूनपासून १६ जुलैपर्यंत भुसावळ ते फैजपूर रस्ता बंद राहणार आहे.

यासाठी अवजड व हलक्या वाहनांसाठी पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे. फैजपूर – हंबर्डी -हिंगोणा – सांगवी – चितोडा – यावल -भुसावळ जड वाहनांसाठी तसेच हलक्या वाहनांसाठी फैजपूर – हंबर्डी -भालोद – चिखली – अंजाळे – भुसावळ हलक्या वाहनांसाठी असा पर्यायी मार्ग असेल, तशी अधिसूचना जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी १३ जून रोजीकाढली.

त्यासाठी या मार्गावरील वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद करून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार १७जूनपासून १६ जुलैपर्यंत भुसावळ ते फैजपूर हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---