केऱ्हाळे येथे ३० वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात हळहळ…!

---Advertisement---

 

रावेर तालुक्यातील केऱ्हाळे बुद्रुक येथे एका ३० वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना रविवारी रात्री घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

केऱ्हाळे बुद्रुक येथील राहुल नामदेव महाजन (वय ३०) यांनी रविवारी रात्री राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपविले. घरातील छताच्या अँगलला केबल वायरच्या साहाय्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. कुटुंबीयांनी तातडीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला.

याप्रकरणी योगेश महाजन यांनी दिलेल्या माहितीवरून रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेचा तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सुनील वंजारी करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---