मेडिकलमध्ये खोकल्याचं औषध मिळणार नाही; औषध खरेदीसाठी आता डॉक्टरांची चिठ्ठी अनिवार्य? केंद्र सरकारचा मोठा निर्णय….!

---Advertisement---

 

खोकल्याचे आणि इतर औषधी सिरपच्या विक्रीबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या नव्या नियमांनुसार आता काही प्रकारची कफ सिरप औषधे खरेदी करण्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन (चिठ्ठी) अनिवार्य करण्यात आले आहे. या निर्णयामुळे मेडिकलमधून औषधांची थेट विक्री करण्यावर निर्बंध येणार आहेत.

केंद्र सरकारने ‘ड्रग्ज रूल्स, 1945’ मध्ये सुधारणा करत ‘ड्रग्ज (फिफ्थ अमेंडमेंट) रूल्स, 2026’ लागू केले आहेत. 9 जून 2026 रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, नोंदणीकृत वैद्यकीय तज्ज्ञांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय संबंधित सिरपची विक्री करता येणार नाही.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, औषधांचा अतिरेक, चुकीचा वापर आणि बनावट अथवा निकृष्ट दर्जाच्या औषधांमुळे होणारे दुष्परिणाम रोखण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे औषधांच्या विक्रीवर अधिक नियंत्रण ठेवता येणार आहे.

मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये दूषित (बनावट) कफ सिरपच्या सेवनामुळे काही मुलांचा मृत्यू झाल्याच्या घटनांनंतर औषधांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले होते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सिरपच्या उत्पादन, वितरण आणि विक्री प्रक्रियेत अधिक कडक नियम लागू करण्याचा निर्णय घेतला.

या सुधारणेचा मसुदा यापूर्वी सार्वजनिक चर्चेसाठी प्रसिद्ध करण्यात आला होता. प्राप्त सूचना आणि हरकतींचा विचार करून अंतिम अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

सरकारच्या नव्या नियमांनुसार देशभरातील औषध विक्रेत्यांना प्रिस्क्रिप्शनशिवाय संबंधित सिरपची विक्री करता येणार नाही. त्यामुळे ग्राहकांना कफ सिरप किंवा तत्सम औषधे खरेदी करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---