दागिने खरेदी करण्याची सुवर्णसंधी! सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीही झाली स्वस्त….!

---Advertisement---

 

जळगावच्या सराफ बाजारातून सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण नोंदविण्यात आली असून, त्यामुळे ग्राहकांना दागिने खरेदीसाठी कमी खर्च करावा लागणार आहे.

सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅममागे तब्बल 1 हजार 400 रुपयांची घट झाली आहे. तर चांदीच्या दरात किलोमागे 3 हजार रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे बाजारात खरेदीदारांचा उत्साह वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि जागतिक बाजारातील चढ-उतारांचा परिणाम मौल्यवान धातूंच्या दरांवर होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. गेल्या काही दिवसांत दरांमध्ये सातत्याने अस्थिरता दिसून येत असताना आता झालेली घसरण ग्राहकांसाठी दिलासादायक मानली जात आहे.

विशेषतः लग्नसराई, सण-उत्सव आणि दागिन्यांच्या खरेदीचा विचार करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अनुकूल असल्याची भावना बाजारपेठेत व्यक्त होत आहे. दरम्यान, सोनं आणि चांदीच्या किमतींमध्ये पुढील काही दिवसांत आणखी चढ-उतार होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---