सावधान! राज्याच्या ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट; जळगावात उच्चांकी तापमानाची नोंद

---Advertisement---

 

राज्यात सध्या हवामानाची दोन टोकाची रूपं पाहायला मिळत आहेत. एका बाजूला कोकण किनारपट्टीवर कडक ऊन आणि उकाड्याने नागरिक त्रस्त झाले असताना, दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचे सावट आहे. भारतीय हवामान विभागाने आज (९ मे) विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांत जोरदार वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि विदर्भातील इतर काही जिल्ह्यांसाठी ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.


हवामानाचा हा बदल सुरू असतानाच उत्तर महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा कायम आहे. शुक्रवारी सकाळी संपलेल्या २४ तासांच्या नोंदीनुसार, जळगाव आणि वाशिम येथे राज्यातील उच्चांकी ४२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. ब्रम्हपुरी, मालेगाव आणि भंडारा येथेही पारा ४१ अंशांच्या पुढे गेला होता.


पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामान कायम राहणार आहे. वाढत्या उकाड्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी विनाकारण बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी प्यावे आणि आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---