कर्जमाफीचा मोठा दिलासा! ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार?

---Advertisement---

 

मुंबई : राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली असून, या योजनेचा लाभ सुमारे ३४ ते ३५ लाख शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे. सहकार विभागाने यासंदर्भातील सविस्तर माहिती राज्य सरकारकडे सादर केली आहे.
३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेले पीककर्ज असलेल्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो. यासाठी सहकार विभागाने राज्यातील विविध बँकांकडून पात्र कर्जदारांची माहिती मागवली होती. यात शेतकऱ्यांचे आधार क्रमांक, खाते क्रमांक, जमीन नोंदी, कर्जाची रक्कम, परतफेडीची माहिती, व्याज आणि मुद्दलाची थकबाकी यासह विविध तपशीलांचा समावेश करण्यात आला आहे.
२०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या आर्थिक वर्षांतील नियमित तसेच थकीत कर्जदारांची माहिती संकलित करण्यात आली असून, संबंधित माहितीच्या आधारे पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे.


दरम्यान, सरकारकडून कर्जमाफीसाठीचे अंतिम निकष निश्चित करण्याचे काम सुरू असून, मे महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत या प्रस्तावावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर ३० जूनपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाऊ शकते.
याशिवाय, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही सरकारकडून मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. वेळेत कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे नियमित कर्जदार शेतकऱ्यांनाही आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---