---Advertisement---
नंदुरबार – मे महिन्यात उन्हाळा असल्यामुळे नगरपालिकेने नंदुरबार शहराला दोन दिवसाआड पाणी देण्याची आव्हान केले आहे परंतु विरोधकांचे म्हणणे आहे की निश्चित धरणात पाण्याच्या भरपूर साठा असल्यामुळे शहराला एक दिवस पाणी द्यावे. त्यामुळे कडक उन्हाळ्यामध्ये नगरपालिकेच्या राजकारणात यांनी प्रश्न हा तापलेला आहे. नंदुरबार शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय नंदुरबार नगरपालिकेने माघारी घ्यावा या मागणीचे निवेदन भारतीय जनता पक्ष नंदुरबारच्या वतीने जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांना देण्यात आले आहे. माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित यांच्या मार्गदर्शनाने संसदरत्न माजी खासदार डॉ. हिना गावित यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांद्वारे हे निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विरचक धरणात मुबलक पाणी असतानाही नंदुरबार नगरपालिके ने शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा घेतलेला निर्णय अतिशय चुकीचा असून नागरिकांना तो त्रासदायक ठरणार आहे. नगरपालिकेने हा निर्णय तात्काळ मागे घेऊन एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. याप्रसंगी विरोधी पक्षनेते हिरालाल चौधरी नगरसेवक, आनंदा माळी नगरसेवक लक्ष्मण माळी, शहराध्यक्ष भाजपा नरेश कांकरिया, आकाश चौधरी, नगरसेवक पंकज चौधरी, नगरसेविका नीता मराठे, दीपक चौधरी यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.









