---Advertisement---
बंगाओन : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जी सरकारविरोधात जोरदार हल्लाबोल केला. बंगाओन येथील सभेत त्यांनी घुसखोरांना थेट इशाराच दिला. २९ एप्रिल पूर्वी बंगाल सोडा, अन्यथा ४ तारखेनंतर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.
ममता बॅनर्जी सरकार घुसखोरांना आश्रय देत असल्याचा आरोप करत पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, बंगालमध्ये भाजपा सत्तेवर आल्यानंतर प्रत्येक घुसखोराला बाहेरचा रस्ता दाखवला जाईल. तसेच मतुआ-नमशूद्र आणि इतर निर्वासित कुटुंबांना नागरिकत्व, पासपोर्ट आणि सर्व हक्क देण्याचे आश्वासनही दिले. ही मोदींची हमी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महिलांसाठी मोठी घोषणा
महिलांसाठी एक मोठी घोषणा करत मोदी पुढे म्हणाले, भाजपा सरकारच्या काळात महिलांच्या खात्यात दरवर्षी
३६,००० रुपये जमा केले जातील. तसेच, अंगणवाडी आणि महिला आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पगारातही सुधारणा केली जाईल. याशवाय बंगालमधील सर्व सरकारी नोकऱ्यांमध्ये ३३ टक्के आरक्षण देण्यात येईल. त्यामुळे महिलांना दुहेरी फायदा होईल, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)









