तृणमूल काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरूच; अजून नेते पक्ष सोडणार? ममता दिदींसोबत खेला होबे….!

---Advertisement---

 

पश्चिम बंगालच्या राजकारणात तृणमूल काँग्रेस (TMC) अडचणीत सापडल्याचे चित्र दिसत आहे. आमदारांच्या कथित बनावट स्वाक्षरी प्रकरणाच्या चौकशीदरम्यान सीआयडीने पक्षाशी संबंधित एका कार्यालयावर छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईविरोधात तृणमूल काँग्रेसने कोलकाता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

बनावट स्वाक्षरी प्रकरण
बनावट स्वाक्षरी प्रकरणात तपास सुरू असून त्याचाच भाग म्हणून CID कारवाई करण्यात आली. कारवाईदरम्यान पक्षाचे प्रमुख नेते ममता बॅनर्जी आणि राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी उपस्थित नव्हते. माजी खासदार सुभाष चक्रवर्ती यांच्यावर तपासात अडथळा आणल्याचा आरोप करण्यात येत आहे.या प्रकरणात टीएमसीच्या वतीने खासदार कल्याण बॅनर्जी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, सीआयडीच्या कारवाईवर आक्षेप घेत न्यायालयीन हस्तक्षेपाची मागणी करण्यात आली आहे.

राज्यसभा खासदाराचा राजीनामा
पक्षाला आणखी एक धक्का बसला आहे. राज्यसभा खासदार प्रकाश बराईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. यापूर्वीही पक्षाच्या दोन राज्यसभा खासदारांनी राजीनामे दिल्याने टीएमसीचे राज्यसभेतील संख्याबळ कमी झाले आहे.

या घडामोडींमुळे तृणमूल काँग्रेसमध्ये अंतर्गत अस्थिरथा असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही नेते किंवा खासदार पक्ष सोडू शकतात, अशी राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यामुळे पश्चिम बंगालमधील राजकीय समीकरणांवर या घटनांचा काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---