---Advertisement---
यावल भुसावळ मार्गावरील अंजाळे घाटावर चारचाकी वाहनाने मोटरसायकल धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार तर दुसरा गंभीर जख्मी झाल्याची घटनासमोर आली आहे .
या अपघातासंदर्भात मिळालेली माहीती अशी की, लखन जोहरी राहणार यावल हे दुचाकी वाहनाने भुसावळकडून यावलकडे येत असतांना यावल हुन भुसावळकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी डंपर वाहन क्रमांक एमएच /१९ सि.वाय ६६५१ या वाहनाने यावल कडे येणाऱ्या मोटरसायकल क्रमांक १९ डी यु,६५२१ या दुचाकी मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात लखन अशोक जोहरी (वय ३२) राहणार यावल यांचा जागीच मृत्यु झाला असुन मोटरसायकलवर सोबत असलेल्या मयताच्या वहिनी अनिता संदीपसिंग जोहरी )वय ५o) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे पाठविण्यात आले आहे .
या संदर्भात यावल पोलीस ठाण्याचे पथक अपघातास्थळी रवाना झाले असल्याची माहीती मिळत आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.









