---Advertisement---
जळगाव जिल्ह्यात सध्या तापमानाचा पारा मोठ्या प्रमाणावर वाढला असून उष्माघाताचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, आरटीओ कार्यालयात येणाऱ्या वाहनमालक, चालक आणि नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) कामकाजाच्या वेळेत तात्पुरता बदल केला आहे.
प्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्यालयातील अपॉइंटमेंटच्या वेळेत बदल करण्यात आला असून, आता नवीन वेळ सकाळी ८:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत निश्चित करण्यात आली आहे.
या कामांसाठी लागू असेल बदल:
योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण (Fitness Certificate Renewal)
कच्ची व पक्की अनुज्ञप्ती चाचणी (Learning & Permanent License Test)
इतर सर्व अनुज्ञप्ती संबंधित कामे.
नागरिकांना आवाहन
वाढत्या उन्हाची तीव्रता पाहता, सर्व नागरिक, वाहनधारक आणि अनुज्ञप्तीधारकांनी आपल्या कामाच्या अपॉइंटमेंट वरील सुधारित वेळेतच (सकाळी ८ ते दुपारी २) घ्याव्यात, असे आवाहन राजेंद्र वर्मा यांनी केले आहे.
हा बदल तात्पुरत्या स्वरूपाचा असून उष्णतेची तीव्रता कमी होईपर्यंत लागू राहणार आहे. त्यामुळे आरटीओ कार्यालयात कामासाठी जाणाऱ्या नागरिकांनी वेळेचे नियोजन करूनच घराबाहेर पडावे.









