१९ हजारांसाठी बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत गेलेल्या जीतूचं नशीब पालटलं; मदतीत मिळाले १५ लाख!

---Advertisement---

 

१९ हजारांसाठी बहिणीचा सांगाडा खांद्यावर घेऊन बँकेत पोहोचलेल्या जीतू मुंडा यांची कहाणी देशभर गाजली होती. बँकेच्या नियमांमुळे झालेल्या या अमानवी प्रकारानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली होती. आता मात्र जीतू यांच्या आयुष्यात मोठा बदल झाला असून देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे.
ओडिशातील रहिवासी असलेल्या जीतू मुंडा यांना त्यांच्या मृत बहिणीच्या खात्यातील १९ हजार रुपये काढायचे होते. मात्र, बँकेकडून मृत्यूचा पुरावा मागण्यात आल्यानंतर त्यांनी थेट बहिणीचा सांगाडाच खांद्यावर घेऊन बँक गाठली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांनी बँक व्यवस्थेवर टीका केली.


या घटनेनंतर अनेक सामाजिक संस्था आणि व्यक्तींनी जीतू यांना आर्थिक मदत केली आहे. ‘फिजिक्स वाला’चे CEO अलख पांडे यांनी १० लाख रुपयांची मदत जाहीर केली, तर राजस्थानच्या कृषी मंत्र्यांनीही आपला एका महिन्याचा पगार जीतू यांना दिला. विविध स्तरांतून मिळालेल्या मदतीमुळे जीतू मुंडा यांना आतापर्यंत तब्बल १५ लाख रुपयांची मदत मिळाली आहे.
दरम्यान, या प्रकरणावर बँक व्यवस्थापकाने स्पष्टीकरण देताना “मी फक्त कागदपत्रं मागितली होती, सांगाडा आणायला सांगितलं नव्हतं,” असं म्हटलं आहे. मात्र, जीतू मुंडा यांनी “बहिणीला घेऊन या” असंच स्पष्टपणे सांगण्यात आल्याचा दावा कायम ठेवला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---