चाळीसगावमध्ये अल्पवयीन मुलीवर चुलत काकाचा लैंगिक अत्याचार; आक्षेपार्ह फोटो व्हायरल करून ब्लॅकमेल ची धमकी….!

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नात्यातील चुलत काका आणि पीडितेच्या भावाचा मित्र असलेल्या संशयिताने ओळखीचा गैरफायदा घेत हा प्रकार केल्याचा आरोप आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नेहमी पीडितेच्या घरी येत-जात होता. या ओळखीचा फायदा घेत त्याने मुलीला मैत्री करण्यास भाग पाडले. त्यानंतर एका ठिकाणी तिच्यासोबत फोटो काढत ते व्हायरल करण्याची धमकी दिली. या भीतीचा फायदा घेत आरोपीने मुलीवर जबरदस्तीने अत्याचार केला.

याचदरम्यान आरोपीने पीडितेचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ काढून तिची ब्लॅकमेलिंग केल्याचेही समोर आले आहे. विशेष म्हणजे, हे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर, विशेषतः इन्स्टाग्रामवर व्हायरल केल्याने प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.

या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून आरोपीचा शोध घेतला जात आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---