मोदींच्या ‘सोनं खरेदी टाळा’ आवाहनावर जळगावात संमिश्र प्रतिक्रिया; सराफा बाजारात चर्चांना उधाण

---Advertisement---

 

जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या ‘वर्षभर सोनं खरेदी टाळा’ या आवाहनावर जळगावातील सराफा व्यावसायिक आणि ग्राहकांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या या आवाहनाचा सुवर्ण व्यवसायावर परिणाम होऊ शकतो, अशी प्रतिक्रिया सराफा व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे.
जळगावातील सराफा व्यावसायिक आकाश भंगाळे यांनी सांगितले की, सुवर्ण व्यवसाय हा मोठ्या प्रमाणावर रोजगार आणि अर्थचक्राशी जोडलेला उद्योग आहे. त्यामुळे सोन्याच्या खरेदीवर मर्यादा आल्यास बाजारपेठेवर त्याचा परिणाम जाणवू शकतो. मात्र भारतीय अर्थव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पंतप्रधानांनी केलेले आवाहन महत्त्वपूर्ण असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दुसरीकडे ग्राहकांनी या आवाहनाला मिश्र प्रतिसाद दिला. ग्राहक महेश चौधरी आणि जयश्री चौधरी यांनी सांगितले की, भारतीय कुटुंबांमध्ये लग्नसमारंभ, सण-उत्सव आणि गरजेच्या वेळी सोन्याची खरेदी अपरिहार्य असते. त्यामुळे प्रत्यक्षात वर्षभर सोनं खरेदी पूर्णपणे थांबवणे शक्य नाही.
अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी केलेले आवाहन सकारात्मक असले तरी सामान्य नागरिकांच्या गरजा आणि पारंपरिक खरेदीची मानसिकता लक्षात घेता त्याची अंमलबजावणी कठीण असल्याचे मतही ग्राहकांनी व्यक्त केले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---