मेथी स्थानकावर बस थांबत नसल्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी; आगार व्यवस्थापकांना निवेदन….

---Advertisement---

 

शिंदखेडा तालुक्यातील मेथी येथे राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस थांबत नसल्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी असून त्यामुळे प्रवासासाठी येणाऱ्या अडचणींवर तोडगा काढावा व मेथी येथे बसेसला थांबा देण्यात यावा व सर्व बसेस थांबवण्यात यावी अशी मागणी करण्याची निवेदन साहेबराव गोसावी खरेदी विक्री संघ उपाध्यक्ष व मेथी ग्रामस्थांच्या वतीने आगार व्यवस्थापक मिलिंद परदेशी यांना देण्यात आले..

मेथी या बस स्थानकावरून मेथी वरझडी, सोनू शेलू व भडणे येथील प्रवासी प्रवास करतात शासकीय व वैद्यकीयकामांसाठी धुळे व इतर भागात येथील प्रवासी प्रवास करतात पण बस चालक व बस वाहक कुठल्याही प्रकारची या थांब्यावर थांबण्याची तसदी घेत नसल्यामुळे प्रवाशांना मोठ्या समस्येला कायमच सामोरे जावे लागत असल्यामुळे मेथी येथील ग्रामस्थांनी याबाबतीतले निवेदन व तक्रार नामदार रावल यांच्याकडे करण्यात आली त्यांनी संबंधित आगार व्यवस्थापकाला पत्र पाठवून मेथी येथे तात्काळ बसेस थांबवण्यात याव्या व प्रवास यांना सेवा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे आपल्या निवेदनात सांगितले आहे ती येथील ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनाबरोबरच नामदार रावल यांचे निवेदन ही आगार व्यवस्थापकांना देण्यात आले यावर तात्काळ अशी कार्यवाही करण्यात येईल अशी माहिती मिलिंद परदेशी आगार व्यवस्थापक यांनी संबंधित ग्रामस्थांना दिले.

धुळ्याहून मेथी कडे येताना कुठलेही बस चालक व वाहक थांबवत नसून वेगवेगळी उत्तरे दिली जातात सध्या सोनगीर दोंडाईचा रस्त्याचे काम चालू असल्यामुळे खाजगी वाहने नसल्यामुळे त्यांना प्रवास करताना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागते त्यामुळे तात्काळ मिळती येथे बस थांबवण्यासाठी सूचना सर्व आगारांना करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. त्याचबरोबर बसेसचा वेग ही मर्यादित ठेवावा प्रवास यांची सुरक्षा यावेळी ग्रामस्थांनी सांगितले..

आगार व्यवस्थापकांना निवेदन देण्यासाठी साहेबराव गोसावी (खरेदी विक्री संघ उपाध्यक्ष सिंदखेडा), लोटन भाईजी (मा सरपंच) योगेश सोनवणे, सचिन सोनवणे, सोनू गिरासे यांची उपस्थिती होती..

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---