स्टेनोग्राफर भरती प्रक्रिया रद्द? भरती प्रक्रिया सुरळीत करावी जळगावात विद्यार्थ्यांकडून आमदारासह मंत्र्यांना निवेदन

---Advertisement---

 

महाराष्ट्रात एमपीएससीमार्फत स्टेनोग्राफर पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जाते. मात्र मागील दोन वर्षांपासून ही प्रक्रिया थांबलेली आहे. यावर्षीही ही भरती रद्द होण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने राज्यभरातील विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या चार ते पाच वर्षांपासून अनेक उमेदवार या भरतीसाठी सातत्याने तयारी करत आहेत. मात्र भरती जाहीर होण्याच्या आधीच ती रद्द होण्याच्या चर्चेमुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. “सरकारने आमच्या तोंडचा घास हिरावून घेतला,” अशी भावना काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच, आपल्या भवितव्याबाबत अनिश्चितता वाढल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यात अंदाजे एक लाखांहून अधिक विद्यार्थी या पदासाठी अभ्यास करत होते. भरती रद्द झाल्यास या सर्वांच्या करिअरवर परिणाम होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जर सरकारने भरती प्रक्रिया पूर्णपणे रद्द केली, तर विद्यार्थ्यांकडून तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---