Tamilnadu AIDMK and Vijay Thalapathy: इकडे राज्यपालांचा विजय थलपतिला धक्का, सत्तास्थापनेसाठी बोलावलंच नाही, तिकडे AIDMK चे 47 पैकी 28 आमदार अचानक रिसॉर्टवर पोहोचले

---Advertisement---

 

Tamilnadu AIDMK and Vijay Thalapathy: गेली अनेक वर्षे द्राविडी राजकारण केंद्रस्थानी राहिलेल्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत (Tamil Nadu Election Result 2026) यंदा मोठा उलटफेर पाहायला मिळाला होता. द्रमुक आणि अण्णाद्रमुक या दोन्ही प्रस्थापित पक्षांना धक्का देत अभिनेता विजय थलपति याच्या टीव्हीके (TVK) पक्षाने निवडणुकीत बाजी मारली होती. टीव्हीके 107 जागा जिंकत तामिळनाडूतील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे अभिनेता विजय थलपति याने गुरुवारी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची तयारी पूर्ण केली होती. मात्र, तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांच्या भूमिकेमुळे विजय थलपति यांच्या मुख्यमंत्री होण्याच्या मार्गात अडथळे निर्माण झाले आहेत. बहुमतासाठी लागणाऱ्या 118 आमदारांच्या सह्या असलेल्या पत्राची मागणी राज्यपालांनी विजय थलपति यांच्याकडे केली. मात्र, टीव्हीके आणि काँग्रेसकडे हे बहुमत नसल्याने आता तामिळनाडूच्या राजकारणात रंगत निर्माण झाली आहे
या सगळ्या घडामोडी सुरु असतानाच अण्णाद्रमुक पक्षात एक मोठी घडामोड घडली आहे. अण्णाद्रमुकच्या 47 पैकी 28 आमदारांना पुद्दुचेरीला नेण्यात आले आहे. या सर्वांना येथील एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले आहे. माजी मंत्री सी.बी. षणमुगम, ओ एस मणियन, थलावाई हे अण्णाद्रमुकचे वरिष्ठ नेते त्यांच्यासोबत आहेत. अण्णाद्रमुक पक्षातील एक गट फुटून विजय थलपति यांच्या टीव्हीकेला पाठिंबा देईल, अशी चर्चा कालपासून सुरु आहे. या पार्श्वभूमीवर अण्णाद्रमुक पक्षातील 28 आमदारांना रिसॉर्टवर हलवण्यात आल्याने अण्णाद्रमुक पक्षात फूट पडण्याच्या चर्चेला आणखीनच जोर आला आहे. अण्णाद्रमुकमधील 30 हून अधिक आमदार पक्षातून बाहेर पडून विजय यांना आपला पाठिंबा जाहीर करण्यास सज्ज असल्याची माहिती आहे. या बंडाचे नेतृत्व सी.व्ही. षण्मुगम हे करत आहेत.

TVK हा पक्ष राज्य विधानसभेत ‘सर्वात मोठा पक्ष’ म्हणून उदयास आला असला, तरीही बहुमताचा आकडा गाठण्यात तो कमी पडत आहे. तामिळनाडूच्या 234 जागांच्या विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यासाठी 118 जागांची आवश्यकता असते, तर TVK ने 108 जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसच्या पाच आमदारांनी टीव्हीकेला पाठिंबा दिला आहे. तरीही बहुमतासाठी टीव्हीकेला पाच जागा कमी पडत आहेत. याशिवाय, विजय थलपति दोन मतदारसंघातून निवडून आल्यामुळे टीव्हीकेचे प्रत्यक्ष संख्याबळ 107 इतकेच मोजले जाऊ शकते, असा अंदाज आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---