धरणगाव बस स्थानक येथे “शिवकमल जलसेवा” चे लोकार्पण उत्साहात संपन्न…!

---Advertisement---

 

धरणगाव येथील बस स्थानक येथे प्रवाशांना शुद्ध व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या उदात्त हेतूने स्व. कमलाबाई शिवराजजी कोठारी यांच्या स्मरणार्थ “शिवकमल जलसेवा” या उपक्रमाचे लोकार्पण मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार श्री. गुलाबरावजी पाटील उपस्थित होते, तर उद्घाटन मा. खासदार श्रीमती स्मिताताई वाघ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दोन्ही मान्यवरांनी रितेश महेंद्र कोठारी ZOOP.ONE PUNE तसेच महेंद्र शिवराजजी कोठारी व कोठारी परिवाराचे कौतुक करत, “प्रवाशांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देणे हे अत्यंत पुण्याचे व समाजोपयोगी कार्य आहे,” असे गौरवोद्गार काढले.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून  नगराध्यक्षा लीलाताई चौधरी, उप नगराध्यक्षा, सुरेखा महाजन,  विभाग नियंत्रक प्रदीपजी बोरसे, अर्बन बँके चे चेअरमन. प्रवीण कुडे, पी.आय.सुनील पवार साहेब, उद्योजक. जीवन (आप्पा) बायस  अध्यक्ष मलकापूर जिल्हा प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष ऍड. महेंद्र बुरड तसेच एरंडोल आगार व्यवस्थापक  निलेश बेंडकुळे यांची उपस्थिती लाभली.

यावेळी न.पा. चे गटनेते पप्पु भावे, माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, नगरसेवक , पवन महाजन, गुलाब मराठे, नितीन बायस, किशोर कंखरे, सुनील चौधरी, मंदाकिनी येवले, प्रियंका जाधव, कविता मच्छिंद्र पाटील , अंजली भानुदास विसावे,परमेश्वर महाजन तसेच माजी नगराध्यक्ष अजय पगारिया यांची विशेष उपस्थिती होती.

तसेच मूर्तिपूजक जैन समाज अध्यक्ष किशोर डेडिया, संघपती सुमित संचेती, हिरालाल कोठारी, मंडळ अध्यक्ष दिनेश पाटील, राजा कोठारी, सरस्वती कोठारी, प्रमिला कोठारी, वैशाली वाणी, वी. टी. माळी सर, रामकृष्ण महाजन, धीरेंद्र पुरभे, मोहम्मद मोईन, ताराचंद पगारिया, रतीलाल चौधरी, शेखर पाटील, श्रेयांश जैन, नरेंद्र पाटील , राजेंद्र पडोळ यांच्यासह पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धरणगाव तालुका प्रवासी मंडळाचे किरण वाणी, सुनील चौधरी, हितेश पटेल, एस. डब्ल्यू. पाटील सर, दिनकर पाटील, रवींद्र बाबुराव भगवत,  डॉ.मिलिंद शिशुपाल डहाळे, डॉ .पंकज अमृतकर, डॉ.स्वप्नील पाटील,ललित येवले,  बाबा कासार, सुशील कोठारी, सुदाम नामदेव चौधरी, संतोष सोनवणे, आनंद बाजपेयी व कीरनसिंग परिहार राजेंद्र पडोळ सर ,ॲड .हर्षल चव्हाण यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

समाजहिताचा हा उपक्रम प्रवाशांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असून, उपस्थित नागरिकांनी कोठारी परिवाराच्या या सेवाभावी कार्याचे मनापासून स्वागत केले. सूत्रसंचालन आर डी महाजन सर यांनी केले तर आभार प्रवासी मंडळाचे सहसचिव किरण वाणी अन्य मानले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---