आईला जिवे ठार मारण्याची धमकी देत, अल्पवयीन मुलीला बेदम मारहाण करत लैंगिक अत्याचार; धरणगाव तालुक्यातील घटना…!

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातल्या धरणगाव तालुक्यात एका गावात अल्पवयीन १७ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन पीडित मुलीच्या आईला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यासह पीडितेला बेदम मारहाण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी संशयित आरोपीला अटक केली आहे.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातल्या पारगाव येथील रहिवासी असलेला आरोपी तेजस गजानन हिरे हा धरणगाव तालुक्यातील गावी आला व त्याने पीडित अल्पवयीन मुलीच्या आजीच्या घरात अनधिकृत प्रवेश केला. त्यानंतर त्याने पीडित अल्पवयीन मुलीच्या आईला जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेवेळी पीडित मुलगी ही प्रतिकार करण्यासाठी त्याच्याशी झटापट करत होती. मात्र आरोपीने तिच्या तोंडाला स्कार्फ बांधला आणि लाकडी दांड्याने तिला बेदम मारहाण केली व तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तरी ही घटना तू कोणालाही सांगितली तर तुझ्या आईसह तुला हार मारू अशी धमकी देऊन आरोपी हा पसार झाला.

संपूर्ण घटनेनंतर घाबरलेल्या अवस्थेत पीडित अल्पवयीन मुलीने जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन गाठलं आणि संपूर्ण प्रकरणाची तक्रार केली व पोलिसांनी या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत आरोपी तेजस हिरे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला तातडीने अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक माधुरी बोरसे या करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---