मी शपथ घेतो की…विजय थलपती बनले तमिळनाडूचे नवे मुख्यमंत्री; शपथविधीनंतर राज्यभर जल्लोष…!

---Advertisement---

 

तमिळ चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आणि TVK पक्षाचे प्रमुख सी. जोसेफ थलपती यांनी आज तमिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत राज्याच्या राजकारणात नवा इतिहास रचला आहे. चेन्नईतील नेहरू स्टेडियममध्ये पार पडलेल्या भव्य शपथविधी सोहळ्यात राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी विजय यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.

2026 च्या तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत विजय यांच्या TVK (तमिळगा वेत्री कळघम) पक्षाला मोठे यश मिळाले. DMK आणि AIADMK या पारंपरिक पक्षांचे अनेक दशकांचे वर्चस्व संपवत TVK ने सत्तेपर्यंत मजल मारली. विविध पक्षांच्या पाठिंब्यामुळे विजय यांनी बहुमताचा आकडा पार केला आणि सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता.

थलपती यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर राज्यभरात विजय समर्थकांनी मोठा जल्लोष साजरा केला. “मी शपथ घेतो की…” या शब्दांसह विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच स्टेडियममध्ये घोषणाबाजी आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. सोशल मीडियावरही या ऐतिहासिक क्षणाचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री तृष्णा कृष्णन यांची उपस्थितीही चर्चेचा विषय ठरली. शपथविधीपूर्वी त्यांनी विजय यांच्या निवासस्थानी भेट दिल्यानंतर त्या थेट कार्यक्रमस्थळी पोहोचल्या. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विजय यांनी जनतेला सामाजिक न्याय, विकास आणि पारदर्शक प्रशासनाचे आश्वासन दिले. नव्या सरकारकडून राज्यातील जनतेच्या अपेक्षा वाढल्या असून, तमिळनाडूच्या राजकारणात हा मोठा राजकीय बदल मानला जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---