जागतिक बौद्धिक संपदा दिन: कल्पकतेचा सन्मान आणि अधिकारांची सुरक्षा

---Advertisement---

 

जळगाव: मानवी बुद्धिमत्तेतून साकारलेल्या नवनवीन संकल्पना, शोध आणि कलाकृतींना कायदेशीर संरक्षण देण्यासाठी दरवर्षी २६ एप्रिल हा दिवस ‘जागतिक बौद्धिक संपदा दिन’ म्हणून साजरा केला जातो. २००० सालापासून World Intellectual Property Organization (WIPO) च्या माध्यमातून हा दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जात आहे.
बौद्धिक संपदा म्हणजे काय?
बौद्धिक संपदा म्हणजे एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या बुद्धीचा वापर करून केलेली निर्मिती. यामध्ये कल्पना, शोध, कलात्मक काम, व्यावसायिक ओळख (ब्रँड, लोगो) आणि उत्पादनांचे डिझाइन यांचा समावेश होतो. या संपदेचे संरक्षण म्हणजे निर्मात्याच्या कष्टाला आणि कल्पकतेला कायदेशीर कवच देणे होय.

बौद्धिक संपदा हक्कांची व्याप्ती वाढवण्यासाठी १९७० मध्ये World Intellectual Property Organization ची स्थापना झाली. ही संस्था संयुक्त राष्ट्रसंघाशी संलग्न असून तिचे मुख्यालय जिनिव्हा येथे आहे. भारताने १९७५ मध्ये या संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले. २६ एप्रिल १९७० रोजी या कराराची अंमलबजावणी झाली, त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व आहे.
बौद्धिक संपदेचे प्रमुख प्रकार
पेटंट (Patent): नवीन वैज्ञानिक किंवा तांत्रिक शोधांचे संरक्षण
ट्रेडमार्क (Trademark): ब्रँड, नाव आणि लोगो सुरक्षित ठेवण्यासाठी
कॉपीराइट (Copyright): लेखक, कलाकार, गायक व चित्रपट निर्मात्यांचे हक्क
औद्योगिक डिझाइन (Industrial Design): उत्पादनांच्या बाह्य रचना आणि स्वरूपाचे संरक्षण


यंदाची थीम: ‘बौद्धिक संपदा आणि खेळ’
२०२६ साली ‘बौद्धिक संपदा आणि खेळ’ ही थीम निश्चित करण्यात आली आहे. खेळातील तंत्रज्ञान, साहित्य डिझाइन आणि प्रसारण हक्कांमध्ये बौद्धिक संपदेची भूमिका अधोरेखित करणे हा यामागील उद्देश आहे.
मागील वर्षांच्या थीम्स
२०२५: बौद्धिक संपदा आणि संगीत
२०२४: IP आणि SDGs
२०२३: महिला आणि IP

भारतामध्ये विविध संस्था संशोधक, शास्त्रज्ञ आणि शेतकऱ्यांच्या नवकल्पनांना संरक्षण देण्यासाठी कार्यरत आहेत. कल्पकतेला योग्य सन्मान आणि मोबदला मिळाल्यास नवसंशोधनाला चालना मिळते, हेच ‘जागतिक बौद्धिक संपदा दिना’चे मुख्य उद्दिष्ट आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---