जळगाव मतदारसंघात दुपारी १२ पर्यंत ८८.१० टक्के मतदान, पाचोऱ्यात शंभर टक्के मतदान; चाळीसगावमध्ये सर्वात कमी ६८.२९ टक्के मतदान….!

---Advertisement---

 

जळगाव विधान परिषद स्थानिक मतदार संघ निवडणूक २०२६ अंतर्गत जळगाव जिल्ह्यात सकाळी ८ ते दुपारी १२ या कालावधीत एकूण ८८.१० टक्के मतदान झाले आहे. निवडणूक प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार ६३० पैकी ५५५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष मतदारांचे मतदान ८७.३० टक्के, तर महिला मतदारांचे मतदान ८८.८९ टक्के नोंदविण्यात आले आहे.

केंद्रनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

  • अमळनेर – ९४.७४%
  • फैजपूर – ८५.१५%
  • भुसावळ – ८४.७५%
  • जळगाव – ८९.०३%
  • एरंडोल – ८९.८७%
  • पाचोरा – १००.००%
  • चाळीसगाव – ६८.२९%

या टक्केवारी नुसार पाचोरा येथे शंभर टक्के मतदान झाल्याने ते केंद्र विशेष ठरले आहे, तर चाळीसगावमध्ये सर्वात कमी ६८.२९ टक्के मतदान नोंदविण्यात आले. दरम्यान निवडणूक प्रशासनाच्या माहितीनुसार मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत असून उर्वरित वेळेत मतदानाचा टक्का आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---