मतदान केंद्रात काही काळ गोंधळ; मतदान प्रक्रियेवर मविआचे उमेदवार शरद तायडे यांची शंका; ओळखपत्र व पेनबाबत उपस्थित केले प्रश्न….

---Advertisement---

 

राज्यासह जळगाव जिल्ह्यात विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मतदानाला सुरुवात झाली असून अनेकांनी मतदानाचा हक्क बजावला आहे त्यातच महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांनी मतदानाचा हक्क बजावल्यानंतर मतदान प्रक्रियेबाबत काही गंभीर शंका उपस्थित केल्या. त्यांच्या आक्षेपांमुळे मतदान केंद्रात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

शरद तायडे यांनी आरोप केला की, मतदान केंद्रात एका उमेदवाराकडे वैध ओळखपत्र असतानाही संबंधित अधिकाऱ्यांनी अतिरिक्त ओळखपत्राची मागणी केली. या प्रकारामुळे त्यांनी मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

तसेच मतदानासाठी अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या पेनबाबतही त्यांनी शंका व्यक्त केली. संबंधित पेन हे ‘मॅजिक पेन’ असल्याचा संशय त्यांनी व्यक्त करत या प्रकरणाची चौकशी होण्याची मागणी केली.

शरद तायडे यांनी उपस्थित केलेल्या शंकांमुळे मतदान केंद्रात काही काळ संभ्रम आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांवर मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याचा दावा त्यांनी केला.

याबाबत निवडणूक आयोगाकडे अधिकृत तक्रार दाखल करणार असल्याचे शरद तायडे यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, या आरोपांबाबत निवडणूक प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---