---Advertisement---

भुसावळमार्गे धावणाऱ्या एक्स्प्रेसला सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

---Advertisement---


जळगाव : भुसावळ मार्गे धावणाऱ्या दोन महत्वाच्या गाड्यांच्या आणखी दोन रेल्वे गाडीला मुदतवाढ देण्यात आलीय. यामुळे भुसावळूहुन मुंबईकडे जाण्यासाठी येण्यासाठी या गाडीचा फायदा होणार आहे.

रेल्वेने मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते रिवा दरम्यान दोन साप्ताहिक विशेष गाड्या सुरू केल्या होत्या. दोन्ही रेल्वेंना आता मुदतवाढ देण्यात आली आहे. रिवा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान सुरू करण्यात आलेली साप्ताहिक रेल्वे (०२१८७) ३ जुलैपर्यंत चालवली जाणार होती.

---Advertisement---

मात्र ही गाडी आता २५ सप्टेंबर पर्यंत चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते रिवा दरम्यान चालवली जाणारी साप्ताहिक विशेष रेल्वे (०२१८८) ४ जुलैपर्यंत चालवली जाणार होती. मात्र आता ही गाडी २६ सप्टेंबरपर्यंत चालवली जाणार आहे. यामुळे प्रवाशांची आता सोय होणार आहे. या स्थानकावर आहे थांबा ? दादर, कल्याण, जंक्शन, नाशिक रोड, मनमाड, भुसावळला थांबा आहे. या गाडीला जळगाव रेल्वेस्थानकावर थांबा देण्यात यावा अशी मागणी जळगाव येथील प्रवाशांकडून करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---