आजचा अर्थसंकल्प महिला सक्षमीकरण आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी ऐतिहासिक तरतूद, पायाभूत सुविधांवर भर- भाजपा जिल्हा सरचिटणीस, डॉ. केतकी पाटील

---Advertisement---

 

केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मध्ये केंद्र सरकारने महिला सक्षमीकरण आणि राष्ट्रीय सुरक्षेला केंद्रस्थानी ठेवत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांची घोषणा करत सामाजिक व आर्थिक समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ‘लखपती दीदी’ योजनेला पुढील टप्प्यावर नेत, महिलांचे उत्पन्न वाढवण्यासाठी विक्री केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण व शहरी महिलांना स्वावलंबी बनवण्यास मोठी मदत होणार आहे.

तसेच, प्रत्येक जिल्ह्यात विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, उच्च शिक्षणासाठी मुलींना सुरक्षित आणि सुलभ वातावरण मिळणार आहे. आरोग्य क्षेत्रातही मोठा निर्णय घेत प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी स्वतंत्र रुग्णालय उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे मातृ व महिला आरोग्य सेवांमध्ये लक्षणीय सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत 2026-27 च्या अर्थसंकल्पात संरक्षण क्षेत्रासाठी एक लाख कोटी रुपयांहून अधिकची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे. या बजेटमध्ये भांडवली खर्चावर विशेष भर देण्यात आला असून,

ड्रोन तंत्रज्ञान, लढाऊ विमाने, आधुनिक तोफखाना, नौदल जहाजे तसेच सीमावर्ती भागातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाणार आहे. हा अर्थसंकल्प महिला सशक्तीकरण, राष्ट्रीय सुरक्षा आणि आधुनिक भारताच्या उभारणीसाठी दिशादर्शक ठरणार असल्याचे स्पष्ट होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---