---Advertisement---
महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून टाकणाऱ्या दुर्घटनेत उपमुख्यमंत्री (दिवंगत) अजित पवार यांचे बारामतीमध्ये अपघाती निधन झाले. 28 जानेवारी रोजी सकाळी बारामती विमानतळावर लँडिंगच्या काही क्षण आधीच त्यांचे खासगी विमान कोसळले आणि या भीषण अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या अपघातात अजित पवारांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव, फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी, पायलट सुमित कपूर आणि को-पायलट शांभवी पाठक यांचा समावेश होता. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असून अजूनही अनेकांना हा धक्का पचवता आलेला नाही.
‘विश्वास बसत नाही’… सुनेत्रा पवारांनी व्हिडीओ कॉल केला…
अपघाताची माहिती देण्यासाठी अजित पवारांच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने सुनेत्रा पवार यांना फोन केला. मात्र ही बातमी ऐकून सुनेत्रा पवारांना कुणीतरी क्रूर थट्टा करत असल्याचा भास झाला. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की, “मला विश्वास बसत नाही.” यानंतर संबंधित कर्मचाऱ्याने थेट व्हिडीओ कॉल करत बारामती विमानतळावरील परिस्थिती दाखवली. व्हिडीओ कॉलवर समोर आलेलं दृश्य पाहताच सुनेत्रा पवार पूर्णपणे हादरल्या आणि त्यांना रडू अनावर झालं. त्यानंतर दिल्लीहून तातडीने बारामतीकडे रवाना झाल्या. ही घटना घडली तेव्हा सुनेत्रा पवार दिल्लीमध्ये होत्या. व्हिडीओ कॉलनंतर क्षणाचाही विलंब न करता त्या तातडीने बारामतीकडे रवाना झाल्या. या घटनेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवान घडामोडींना सुरुवात झाली.









